05 August 2020

News Flash

छत्रपतींचा अपमान भाजपा सहन करणार नाही – चंद्रकांत पाटील

"शिवसेना राऊतांच्या या उद्दाम सवालाशी सहमत आहे का? हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे."

(संग्रहित छायाचित्र)

उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भाजपा आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

पाटील म्हणाले, “शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे. विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेना नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून हेच दिसत आहे. शिवसेना राऊतांच्या या उद्दाम सवालाशी सहमत आहे का? हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल.”

माजी खासदार उदयनराजे यांनी शिवसेनेवर आणि विशेषतः संजय राऊत यांच्यावर केलेली टीका राऊत यांना झोंबली असेल तर ते आपण समजू शकतो. त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नसल्याने थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 7:22 pm

Web Title: bjp will not tolerate insult of chhatrapati says chandrakant patil aau 85
Next Stories
1 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आजही कराचीतच; एजाझ लकडावालाची माहिती
2 ‘लंडन आय’च्या धर्तीवर साकारणार ‘मुंबई आय’; अजित पवारांची घोषणा
3 इमोशनल ब्लॅकमेलिंग, गर्लफ्रेंडने न्यूड फोटो पाठवल्यानंतर त्याने दाखवले खरे रंग
Just Now!
X