घडाळ्याच्या काट्यावर फिराणारी मुंबई सध्या करोनाशी दोन हात करत आहे. अशा परिस्थिती मुंबईकरांसमोर पाण्याचं नवीन संकट उभं राहिलं आहे. मुंबईत बुधवारपासून (५ ऑगस्ट २०२०) २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागच्या दोन वर्षात यावेळेला सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. जी ही जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या ३४% इतका आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर पाणी होते. ही तूट लक्षात घेऊन पालिकेनं उद्यापासून मुंबई महानगर पालिका क्षेत्रात २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी मुसळधार पावसाची आवशकता आहे. गेल्या काही दिवसांआधी झालेल्या पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे धरणातील पाणीसाठी मर्यादित राहिला. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नालाही तोंड द्यावं लागणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची स्थिती