‘प्रभाग’फेरी : ‘पी’ उत्तर विभाग

अंतर्गत भाग :  मनोरी, मालवणी, मढ, मीठ चौकी, नेव्ही नगर, सोमवार बाजार, शांताराम पाडा, पुष्पा पार्क, कुरार व्हिलेज, आप्पापाडा, दिंडोशी कोर्ट, नागरी निवारा.

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

शहरातील सर्वाधिक नगरसेवक असलेला हा विभाग. भौगोलिकदृष्टय़ा सर्वात मोठा नसला तरी लोकसंख्येच्या तुलनेत या विभागाची आघाडी आहे. तब्बल नऊ लाख लोक या भागात अत्यंत दाटीवाटीने राहतात. मराठी, गुजराती, उत्तर भारतीय कनिष्ठ मध्यमवर्गीय यांची वस्ती असलेल्या या भागात असंख्य चाळी, झोपडय़ा वसल्या आहेत. या सर्वाना जोडणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद रस्त्यांचे जाळे पसरले आहे. या जाळ्यापेक्षा समस्यांचे जाळे जास्त गुंतागुंतीचे आहे.  दहा बाय दहा फुटांच्या घरावर आणखी एक मजला बांधून राहणाऱ्या लोकवस्तीमुळे कचरा गोळा करण्यापासून ते शौचालयापर्यंत आणि अरुंद रस्त्यांपासून कोंदट हवेपर्यंतचे प्रश्न आजतागायत सोडवता आलेले नाहीत.

या भागाचा पुनर्विकास हा तर गेल्या वीस वर्षांपासून चर्चेत राहिलेला विषय. मात्र चर्चेच्या पुढच्या पायरीवर सरकलेला नाही. चाळींमधून लाद्या लावून देणे, गटारे बांधणे, शौचालय दुरुस्त करणे यापलीकडे नियोजन करणे लोकप्रतिनिधींच्याही हातात राहत नाही.

प्रभागांच्या समस्या

मूळ रहिवाशांच्या समस्या

आक्सा, मनोर, मढ, मालवण हे समुद्रकिनारे व बाजूला वसलेल्या गावातील मच्छीमार स्वतचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. विकास आराखडय़ात कोळी वस्तीची नोंद करवून घेण्यात त्यांना यश आले असले तरी त्यासोबत मासे सुकवण्याच्या, होडी नांगरण्याच्या, शाकारण्याच्या जागाही कोळीवस्तीत अंतर्भूत करण्याची त्यांची मागणी आहे. नौदलाची जागा असल्याने मालवणी परिसरात मच्छीमारांच्या हालचालीवर, मासे पकडण्यावर, व्यवसायावर मर्यादा येतात. मढ, मनोर, मालवणी या गावांत सुमारे ३५ हजार वस्ती आहे.

*पश्चिम द्रुतगती’चे दुखणे

मालाड पूर्वेमधून पश्चिम द्रुतगती मार्ग जात असला तरी त्याचा मालाडकरांना मुंबईच्या इतर भागांशी जोडण्यास मदत होण्यापेक्षा अडथळाच जास्त येतो. या मार्गावरून खाली येत असलेल्या रस्त्यांकडे कायम वाहनांची कोंडी असते. काही ठिकाणी सबवेमधून पादचाऱ्यांना जाण्यासाठी मार्ग आहेत. पण शांताराम पाडय़ासारख्या ठिकाणी आधीच अरुंद असलेल्या सबवेमध्ये पदपथ बनवायला जागाच शिल्लक नसल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून मार्ग काढण्याची कसरत करावी लागते.

अन्य समस्या

*  मालाडमध्ये ठरावीक भागांत मुबलक पाणी येते, तर दुसरीकडे पाण्याचा दाब कमी असल्याने तेथील रहिवाशांचे हाल होतात. लोकवस्तीचे असमान वितरण आणि गंजलेल्या जलवाहिन्या याचे मुख्य कारण आहे.

* पुष्पापार्क, कुरार गाव, शांताराम पाडा अशा अनेक भागांत दरवर्षी पाणी तुंबते. भरलेली गटारे आणि नाले यामुळे पाण्याचा निचराही वेळेत होत नसल्याने पावसाळ्यातील अध्रेअधिक दिवस हा परिसर जलमय असतो.

*  मालाड पूर्वेचे रस्तेच अरुंद असल्याने येथे रिक्षांचा पर्याय उपयुक्त आहे. परंतु, रिक्षांच्या गर्दीमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होऊन बेस्टच्या लहान बसची वाहतूकही मंदावते. मालाडमधील अनेक वस्त्या टेकडय़ांवर वसल्या असल्याने आजारी माणसे, वृद्ध व लहानांना कोणत्याही वाहनांसाठी डोंगर उतरावा लागतो.

रुग्णालयाची कमतरता

पालिकेचा दवाखाना व रुग्णालय असून नसून काहीच फायदा नसल्याने खासगी डॉक्टर व नर्सिंग होम यांची संख्या प्रचंड आहे. मोठे रुग्णालय म्हणून आतापर्यंत बोरीवलीच्या भगवतीचा आसरा होता. मात्र गेल्या पाच वर्षांत तोही गेल्याने केईएम, नायरकडेच वळावे लागते.

चिंचोळे रस्ते

मालाड पूर्वेला असलेला पश्चिम द्रुतगती महामार्ग व त्या रेल्वे सबवेपर्यंत जोडणारा दत्त मंदिर मार्ग वगळता सर्व रस्ते पन्नास फूटही रुंदीचे नाहीत. दोन्ही बाजूला दुकाने व त्यापुढे फेरीवाले व त्यानंतर पादचारी या सगळ्यातून वाहनांना सरकायला अक्षरश एक माíगका उरते. मालाड रेल्वे स्थानकाला जोडणारा पूर्वेकडील दफ्तरी रोड या मुख्य रस्त्याचीही हीच अवस्था आहे.

सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न

मालाडमधील अर्धीअधिक लोकवस्ती सार्वजनिक शौचालयांवर विसंबून आहे. महानगरपालिका व खासगी व्यवस्थापन असलेल्या शौचालयांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे शौचालयात लागणाऱ्या रांगा, अस्वच्छता यामध्ये दहा वर्षांपूर्वीपेक्षा बरी स्थिती असल्याचे स्थानिक मान्य करतात. मात्र तरीही स्वच्छ भारत अंतर्गत घरात शौचालय देण्याच्या स्वप्नापासून हे वास्तव शेकडो मल दूर आहे.

शैक्षणिक सुविधांचा अभाव

मालाडमधील महानगरपालिकांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे. मात्र खासगी इंग्लिश शाळांना बरे दिवस आले आहेत. मात्र या परिसरात चांगल्या महाविद्यालयांची, तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची कमतरता आहे. अंधेरी, वांद्रे किंवा त्यापुढचा प्रवास करूनच विद्यार्थ्यांना महाविद्यालय गाठावे लागते.

महिला उमेदवारांचा कस लागणार

मालाड पूर्व व पश्चिमेचा भाग एकत्र करून झालेल्या या वॉर्डमध्ये सध्या १६ नगरसेवक आहेत. त्यात शिवसेनेचे सात, काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी तीन व राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. मराठी मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये शिवसेनेचा पाया पक्का असून उच्च मध्यमवर्गीयांच्या जागा भाजपकडे आहेत. या वॉर्डमध्ये आणखी दोन प्रभाग या वेळी वाढले आहेत. जुन्या १६ पैकी ५ विभागांत महिला होत्या तर पुनर्रचनेत नव्या १८ प्रभागांपैकी ११ प्रभाग महिलांसाठी असून त्यातील तीन मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित सात मतदारसंघांपैकी पाच प्रभाग मागासवर्गासाठी राखीव असून दोन प्रभाग खुले आहेत. त्यामुळे या वेळी राजकीय पक्षांच्या वर्चस्वासोबतच महिला उमेदवारांची निवडही मतदानावर प्रभाव टाकणारी असेल.

शांताराम पाडा येथील हायवेखालील रस्त्यावर वाहनांची कायम गर्दी असते. पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे रस्ता ओलांडणेही अशक्य होते. याविषयी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. हायवेच्या बाजूने जाणारी पाण्याची वाहिनी वर्षभरात किमान पाच-सहा वेळा तरी फुटते. 

– साक्षी माने, मालाड

गेल्या पाच वर्षांत एकाही रस्त्याची डागडुजी झालेली नाही. अर्धा ते एक तास कमी दाबाने पाणी येत असल्याने पंपाशिवाय घरात पाणीच येत नाही. पाणी आले तर ते दूषित असते. फक्त कचरा वेळेत नेला जातो. वस्त्यांच्या बाजूला असलेल्या शासकीय जागांवर अतिक्रमणे झाली आहेत.

– हेमंत कोळी, मालवणी

 

सध्याचे नगरसेवक

*  प्रभाग २९

नगरसेवक – अजित भंडारी

*  प्रभाग ३०

नगरसेवक- विश्वास घाडीगावकर

*  प्रभाग ३१

नगरसेवक – परमिंदर भमरा

*  प्रभाग ३२

नगरसेवक – अनघा म्हात्रे

*  प्रभाग ३३

नगरसेवक – डॉ. राम बारोट

*  प्रभाग ३४

नगरसेवक – सुनील गुजर

*  प्रभाग ३५

नगरसेवक – भोमसिंग राठोड

*  प्रभाग ३६

नगरसेवक – प्रशांत कदम

*  प्रभाग ३७

नगरसेवक – मनीषा पाटील

*  प्रभाग ३८

नगरसेवक -रूपाली रावराणे

*  प्रभाग ३९

नगरसेवक -सायली वारिसे

*  प्रभाग ४०

नगरसेवक -ज्ञानमूर्ती शर्मा

*  प्रभाग ४१

नगरसेवक – विनोद शेलार

*  प्रभाग ४२

नगरसेवक – दीपक पवार

*  प्रभाग ४३

नगरसेवक – कमरजहा सिद्दीकी

*  प्रभाग ४४

नगरसेवक – सिरील डिसोजा

 

फेररचनेनंतरची प्रभाग रचना 

*  प्रभाग ३२

लोकसंख्या – ५६,७१०

आरक्षण – महिला मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – मनोरी बेट, आकाशवाणी

*  प्रभाग ३३

लोकसंख्या – ५२,४१४

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – खारोडी, आझाद नगर, वळनाई गाव, आझमी नगर

*  प्रभाग ३४

लोकसंख्या – ५८,९१०

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – बीएमसी कॉलनी, ओल्ड कलेक्टर कंपाउंड, मालवणी पोलीस स्टेशन

*  प्रभाग ३५

लोकसंख्या – ५५,४२८

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – आदर्श दुग्धालय, डॉमनिक कॉलनी, मीठ चौकी, गोरसवाडी

*  प्रभाग ३६

लोकसंख्या – ४९,३७०

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – पुष्पा पार्क, गौतम नगर, सीओडी, शांताराम पाडा, रहेजा संकुल

*  प्रभाग ३७

लोकसंख्या – ४९,४५२

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – तानाजी नगर, कुरार गाव, सेंट जोसेफ हायस्कूल

*  प्रभाग ३८

लोकसंख्या – ४९,५८९

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – तानाजी नगर, महाराणी सईबाई विद्यामंदिर, नूतन विद्यामंदिर

*  प्रभाग ३९

लोकसंख्या – ४९,३२०

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – गोकुळ नगर, दुर्गा नगर

*  प्रभाग ४०

लोकसंख्या – ५३,७९९

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – संकल्प कॉलनी, नागरी निवारा, मीरा नगर, वंजारा पाडा, दिंडोशी कोर्ट

*  प्रभाग ४१

लोकसंख्या – ४९,०४३

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा गांधी विकास संस्था

* प्रभाग ४२

लोकसंख्या –  ४९,८२७

आरक्षण – महिला मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – पिंपरीपाडा, अंबापाडा, महर्षी शंकर बुबा साळवी मैदान, शिवसृष्टी सेवा संस्था

* प्रभाग ४३

लोकसंख्या – ५२,६३०

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – पठाणवाडी, शांताराम तलाव, त्रिवेणी नगर, कोकणी पाडा

* प्रभाग ४४

लोकसंख्या – ५४,०५३

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – रहेजा टाउनशिप, दिंडोशी बस आगार, एमएचबी कॉलनी

* प्रभाग ४५

लोकसंख्या – ५४,८०८

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – लोअर गोविंदनगर, रामलीला मैदान, धोबीघाट, नवजीवन हायस्कूल, एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय

* प्रभाग ४६

लोकसंख्या – ५७,६६८

आरक्षण – महिला मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – मामलेतदार वाडी, नेव्ही नगर, सोमवार बाजार

* प्रभाग ४७

लोकसंख्या – ५४,३७२

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – काचपाडा, एव्हरशाइन नगर, गोरेगाव क्रीडा संकुल, भुजबळ तलाव

* प्रभाग ४८

लोकसंख्या – ५४,०२१

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – न्यू कलेक्टर कंपाउंड, सामना नगर, गायकवाड नगर, मालवणी बस आगार

*  प्रभाग ४९

लोकसंख्या – ५७,९८१

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभागक्षेत्र – मढ बेट, दारिवली व्हिलेज, अंबोज वाडी