स्वत:च्या विश्वात हरवून सर्वसामान्य जीवनापासून वेगळे ठरणाऱ्या स्वमग्नता विकाराने ग्रस्त (ऑटिझम) मुलांना आता हक्काची शाळा आणि उपचारासह शिक्षण मिळणार आहे. अंधेरी पश्चिम येथे सुरू करण्यात येणाऱ्या या शाळेचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. अंधेरी (प.) येथील लोखंडवाला संकुलामागे मुंबई महापालिकेने एक नवी इमारत बांधली असून सुमारे ७,६५० चौरस फुटाच्या जागेत कल्याण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये ऑर्गनायझेशन फॉर ऑटिस्टिक इन्डीव्हीज्युअल्स (ओएआय) या संस्थेला पालिकेने सामाजिक उत्तरदायित्व तत्वाआधारे जागा उपलब्ध केली आहे.