मुंबई : माजी मिस्टर इंडिया विजेता शरीरसौष्ठवपटू मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी दिली.

मनोज पाटील यांनी अभिनेता साहिल खान यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहली होती. त्यांची ही चिठ्ठी समाजमाध्यमातून प्रसारित झाली. दरम्यान याप्रकरणात ओशिवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता साहील खान याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली