मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा फोन दहशतवादविरोधी पथकाला आला होता. यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

चेल्लूर यांना धमकावणारा फोन दहशतवादविरोधी पथकाला आला होता. त्यानंतर न्यायालय परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चेल्लूर यांच्या दालनाबाहेर श्वानपथक तैनात करण्यात आले आहे. न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, असे सांगण्यात येत आहे.