राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सदानंद लाड यांनी मंगळवारी आत्महत्या केली होती. माजगाव येथील ‘लाडाचा गणपती’ मंदिरात त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये बिल्डर सिद्धार्थ ग्रुप व ताहीर भाई यांची समोर आली आहेत.

आज सकाळी सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या मंदिराच्या टेरेसच्या छताच्या अँगलला नायलॉन दोरी बांधून लाड (पप्पू) यांनी गळफास घेतला. या संदर्भात त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये बिल्डर सिद्धार्थ ग्रुप व ताहीर भाई यांच्या मनमानी कारभारास कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आधारावर त्यांचा मुलगा अंकुर लाड याने बिल्डर सिद्धार्थ ग्रुप व ताहीर भाई यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. या प्रकरणी गु.र.क्र.०९/१९, कलम ३०६, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद करून घेण्यात आला आहे.

maharashtra political crisis eknath shinde
चावडी : एकनाथांचा ‘उदय’ !
Union minister Piyush Goyal, BJP’s candidate for Mumbai North, interacts with supporters. (Express photo by Sankhadeep Banerjee)
पियूष गोयल यांच्या पहिल्याच प्रचारसभेत घुमला मतदारांचा सूर, “मुंबईचा आवाज आता दिल्लीत!”
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

दरम्यान, सदानंद लाड यांनी पंधराहून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ज्या मंदिरात त्यांनी आत्महत्या केली ते ‘लाडाचा गणपती’ मंदिर त्यांनीच बांधले होते.