मुंबईतील भायखळा स्थानकाच्या बाजूला असलेला उड्डानपूल रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार पुढील पंधरा दिवसांसाठी हा उड्डानपूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहतुकीच्या कोणत्याच पर्यायांबाबत पूर्वसूचना न दिल्याने दक्षिण मुंबईहून दादरच्या दिशेने येणा-या गाड्य़ांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर प्रचंड कोंडी झाल्याचे  चित्र पहावयास मिळत आहे.  

सविस्तर वृत्त लवकरच.