News Flash

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक

भारतीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले परिपत्रक काढून ही घोषणा केली आहे

पांडुरंग फुंडकर (संग्रहित छायाचित्र)

राज्याचे कृषिमंत्री आणि भाजपा नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले परिपत्रक काढून ही घोषणा केली आहे. नामांकन भरण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २६ सप्टेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ३ ऑक्टोबरला मतदान होईल. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. तर ५ वाजता मतमोजणी सुरू होईल अशीही माहिती निवडणूक आयोगाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 6:48 pm

Web Title: bye election to the legislative council maharashtra by the member of legislative assembly
Next Stories
1 शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा दिसली-नारायण राणे
2 शिवसेनेशिवाय मुंबई बंद १०० टक्के यशस्वी: संजय निरूपम
3 सरकार विरोधकांच्या एकजुटीला घाबरले-अशोक चव्हाण
Just Now!
X