मध्य रेल्वेवरील मोटरमन्सनी ओव्हरटाइम करण्यास नकार दिला असल्याने  मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवरील नऊ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून वाहतूक १५ ते २० मिनिटाने उशिरा सुरु आहे. मोटरमनच्या २२९ रिक्त जागा भरा, सिग्नल नियम मोडल्यास मोटरमनला कामावरुन कमी करण्याचा नियम मागे घेण्यात यावा, अशा मागण्या करत मध्य रेल्वेवरील मोटरमनकडून शुक्रवारी ओव्हरटाईम न करता नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला होता.

मध्य रेल्वेकडून रेल्वे संघटनांसोबत उशिरापर्यंत तोडगा काढण्याचेही काम सुरू होते. मात्र तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय हा शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

सध्या मध्य रेल्वेवर ६७१ मोटरमन कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेल्या लोकल फेऱ्या, तुलनेने मोटरमनची कमी असलेली संख्या, त्यातच लाल सिग्नल असल्यास लोकल चालवताना मोटरमनकडून तो नियम नकळत मोडल्यास कामावरुन कमी करण्याचे प्रकार होतात. त्यामुळे मोटरमनने २२९ रिक्त जागा भरतानाच लाल सिग्नल मोडल्यास कामावरुन कमी करण्याचा नियम लागू करु नये, अशी मागणी केली आहे.

सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे या मागण्या करतानाच त्याला नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, एससीएसटी यासह अन्य काही रेल्वे कर्मचारी संघटनांनी पाठिंबाही दिला आहे. या मागण्यांसाठी शुक्रवारपासून मोटरमनने ओव्हरटाईम न करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ओव्हरटाईम करणार नसल्याची भूमिका घेतल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.