31 May 2020

News Flash

आसनगाव ते कसारा  विशेष पॉवर ब्लॉक

उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार असून सीएसएमटी ते कसारा सकाळी ९.४१ ची लोकल आसनगावपर्यंतच धावणार आहे.

१० आणि १७ नोव्हेंबर रोजी उपनगरी रेल्वे, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी १० आणि १७ नोव्हेंबरला अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे काही उपनगरी रेल्वे फेऱ्या, मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक ११०५५ एलटीटी ते गोरखपूर एक्स्प्रेस आसगनाव स्थानकात दुपारी १२.२० ते १, ट्रेन क्रमांक १२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस वाशिंद स्थानकात दुपारी १२.२५ ते दुपारी १, ट्रेन क्रमांक १२८६९ सीएसएमटी ते हावडा एक्स्प्रेस खडवली स्थानकात दुपारी १२.२६ ते दुपारी १ दरम्यान थांबविण्यात येणार आहे. तर ट्रेन क्रमांक १२२९४ अलाहाबाद ते एलटीटी दुरान्तो एक्स्प्रेस आणि १२१४२ पालटलीपुत्र ते एलटीटी एक्स्प्रेस एलटीटीला आपल्या निर्धारित वेळेपेक्षा पाच ते पंधरा मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. ट्रेन क्रमांक १२११७आणि १२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार असून सीएसएमटी ते कसारा सकाळी ९.४१ ची लोकल आसनगावपर्यंतच धावणार आहे. तर कसारा ते सीएसएमटी ही सकाळी ११.१२ ची लोकल आसनगाव स्थानकातून सकाळी ११.४९ ला सुटेल. कसारा ते सीएसएमटी दुपारी १२.१९ वाजताची लोकल रद्द केलेली आहे. आसनगाव ते सीएसएमटी विशेष लोकल दुपारी १२.२७ वाजता सोडण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 1:46 am

Web Title: central railway special power block akp 94
Next Stories
1 कर्ज परतफेडीसाठी बँकांनी तगादा लावल्याने आत्महत्या
2 राज्यात भाजपचेच सरकार येणार – फडणवीस 
3 मला खोटारडे ठरविल्यानेच चर्चेची दारे बंद – उद्धव ठाकरे
Just Now!
X