News Flash

प्रशांत दामलेंशी गप्पांचा योग

नाटकात मनापासून रमलेल्या प्रशांत दामलेंना प्रयोगांचा विक्रमादित्य असेही म्हटले जाते

मुंबई : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा, न थकता एकामागोमाग एक नाटय़प्रयोग करणारा, मस्त खा आणि स्वस्थ रहा म्हणत खवय्येगिरीच्या गप्पाही चवीने रंगवणारा लोकांचा आवडता अभिनेता अशी प्रशांत दामले यांची ओळख. नाटकात मनापासून रमलेल्या प्रशांत दामलेंना प्रयोगांचा विक्रमादित्य असेही म्हटले जाते. कारण सर्वाधिक प्रयोग करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. खाणे, गाणे आणि नाटक या तिन्हींचे अजब रसायन अंगी बाळगून असलेल्या प्रशांत दामलेंसारख्या हरहुन्नरी अभिनेत्याला भेटण्याचा योग ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादाच्या निमित्ताने जुळून आला आहे. ‘टूरटूर’ ते ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’पर्यंतचा अभिनेता-निर्माता म्हणून झालेला प्रशांत दामले यांचा प्रवास शुक्रवारी, २५ सप्टेंबरला जाणून घेता येईल. हसत-खेळत सहज सुंदर अभिनयातून रसिकांचे निखळ मनोरंजन करणारे प्रशांत दामले हे कोण्या एका पिढीचे नव्हे तर अबालवृद्धांची पसंती मिळवलेले कलाकार आहेत. मराठी नाटके  सातासमुद्रापार नेणाऱ्या, खवय्येगिरीचे कार्यक्रमही सहज रंगवणाऱ्या प्रशांत दामलेंसारख्या हरहुन्नरी अभिनेत्याशी तितक्याच सहजपणे बोलत बोलत ही गप्पांची मैफल रंगणार आहे.

सहभागासाठी : http://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_25Sept येथे नोंदणी आवश्यक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:24 am

Web Title: chat with prashant damle loksatta sahaj bolta bolta zws 70
Next Stories
1 करिअर निवडताना आजच्या अस्थिरतेची धास्ती नको
2 खासगी रुग्णालयात दुप्पट ऑक्सिजनचा वापर!
3 उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं- अनुराग कश्यप
Just Now!
X