गॅस सिलेंडर घेताना त्रुटी आढळल्यास हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा; वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून ग्राहकांना आवाहन

सर्वसामान्य ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सिलिंडरच्या प्रमाणित वजनापेक्षा कमी वजनाने सिलिंडर पुरविले जात असल्याचे उघड झाले आहे. नुकताच राज्यभरात वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे ‘एलपीजी सिलिंडर तपासणी मोहीम’ राबविण्यात आली. यात ४५० प्रकरणात त्रुटी आढळून आल्याने ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे वजन तपासून घेण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…

घरगुती गॅसपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैध मापन शास्त्र अधिनियम २००९च्या अंतर्गत ग्राहकांना सिलिंडर वितरण करते वेळी वजन काटय़ावर सिलिंडरचे वजन करून देणे बंधनकारक आहे. यासाठी अचूकता वर्ग  असलेला वजनकाटा वापरणे सक्तीचे आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये निव्वळ गॅसचे वजन १४.२ कि.ग्रॅ असणे आवश्यक आहे. गॅस सिलिंडरवर छापील वजन आणि गॅसचे वजन यावरून प्रत्यक्षात वजन काटय़ाद्वारे सिलिंडरमधील निव्वळ वजनाची खातरजमा केली जाऊ  शकते. मात्र गॅसपुरवठा करणारे अनेक कर्मचारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच वैध मापन शास्त्र यंत्रणेचे प्रमुख अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरून राज्यभरात राबवण्यात आलेल्या सिलिंडर तपासणी मोहिमेंतर्गत तब्बल ४५० खटल्यांची नोंद करण्यात आली आहे. याच धर्तीवर गुप्ता यांनी, ग्राहकांना गॅस सिलिंडर घेताना सिलिंडरचे वजन तपासून घ्यावे व त्यात काही त्रुटी आढळल्यास नियंत्रण कक्षाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे. यासाठी ०२२-२२८८६६६६ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.