News Flash

मुंबईत रुग्णवाढ; दिवसभरात ५१४ बाधित

नव्या करोना रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३६ हजार ८२४  झाली आहे.

मुंबईत रुग्णवाढ; दिवसभरात ५१४ बाधित

मुंबई : करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी वाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात ५१४ रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असून, बुधवारी ६०४ रुग्ण करोनामुक्त झाले.

नव्या करोना रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३६ हजार ८२४  झाली आहे. त्यातील ७ लाख १३ हजार १७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ६०२ उपचाराधीन रुग्ण आहेत. करोनामुक्तांचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत बुधवारी २९ हजार ८८६ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ९७ लाख ९९ हजार ८३९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 1:25 am

Web Title: corona virus infection patient in mumbai akp 94 2
टॅग : Corona
Next Stories
1 लसमात्रांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित
2 ‘राजकीय लढायांसाठी न्यायालयांचा वापर नको’
3 दाभोलकर हत्याप्रकरणी आरोप निश्चित
Just Now!
X