मुंबईत करोनाचे सर्वात जास्त रुग्ण असतानाही महापालिकेला गेल्या चार महिन्यात फक्त ८६ कोटींची आर्थिक मदत मिळाली आहे. माहिती आधिकार कार्यकर्ते (आरटीआय) अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे. अनिल गलगली यांनी आरटीआय अंतर्गत मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या निधीची माहिती मागविली होती. मुंबई महापालिकेच्या वित्त विभागाच्या मुख्य कार्यालयाने अनिल गलगली यांना मिळालेल्या विविध प्रकारच्या निधीची माहिती दिली. अनिल गलगली यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई पालिकेला गेल्या चार महिन्यांत अवघ्या ८६ कोटींची मदत मिळाली आहे. या फंडाचा सर्वाधिक वाटा मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. एकूण जमा रक्कमेपैकी ८४ टक्के रक्कम त्यांनी दिली आहे”.

84 thousand electricity connections have been provided to customers of all categories in last year
नागपूर: वर्षभरात ८४ हजार नवीन वीज जोडण्या; ई- वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठीही…
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

“गेल्या चार महिन्यांत मुंबई महापालिकेला करोनाशी लढण्यासाठी एकूण ८६ कोटी ५ लाख ३० हजार ३०३ रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी ७२.४५ कोटींची मदत दिली आहे. मिळालेल्या मदतीत ही सर्वात जास्त रक्कम असून एकूण निधीपैकी ८४ टक्के आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी ११.४५ कोटी जमा केले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने ५० लाख रुपये दिले असून लोकांनी ३५.३२ लाखांची मदत केली आहे. तर आमदारांकडून निधीमध्ये फक्त १.२९ कोटी जमा झाले आहेत. यामध्ये फक्त सात आमदारांचा समावेश आहे,” अशी माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे.

करोनाशी सामना करताना मुंबई महापालिकेने आतापर्यंत ७०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. मुंबई महापालिकेला केंद्र सरकार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणतीही मदत मिळालेली नाही. महापालिकेच्या तिजोरीत पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणतीही पुढाकार घेतला नसल्याचं,” अनिल गलगली यांनी म्हटलं आहे.