मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय वृद्दाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मंगळावार, ८ जून पहाटेपासून वृद्ध व्यक्ती रुग्णालयातून बेपत्ता होती. आज बुधवारी त्यांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर आढळला.
रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे जीव गेल्याचा आरोप वृद्धाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मालाड परसरात राहणारे ८० वर्षीय वृद्धाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आणखी वाचा- शिवसेना नगरसेवकाचा करोना व्हायरसमुळे मृत्यू
सोमवारी पहाटेपासून नातेवाईक वृद्ध व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा फोन कोणीही उचलत नव्हते. काही वेळानंतर रुग्णालयातील शेजराच्या बेडवरील व्यक्तीनं वृद्धाच्या बेडवर पडलेला फोन उचलला. आणि रुग्ण सकाळपासून बेडवर नसल्याचं सांगितलं. शताब्दी रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे ८० वर्षीय आजोबा बेपत्ता झाले आणि आज त्यांचा मृतदेह आढळला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 12:35 pm