News Flash

VIDEO : मुंबईत पोलीस ठाण्यात दाम्पत्याला बेदम मारहाण

'एएनआय' वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे

कांदिवलीमध्ये पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीतील पॅसेजमध्ये पोलीस अधिकारी नवरा बायकोला बेदम मारहाण करीत असल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. पण त्यांना पोलिसांनी मारहाण का केली, याबद्दल माहिती मिळालेली नाही. ही घटना १० मे रोजी घडल्याचे समजते. त्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या एका व्यक्तीने आपल्याकडील मोबाईलमधून या मारहाणीचे चित्रण केले. या प्रकरणात चौकशी सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2016 12:17 pm

Web Title: couple thrashed inside a police station in kandivali
Next Stories
1 ठाण्यातही करिअर मार्गदर्शन
2 उत्तरपत्रिका घोटाळाप्रकरणी आज कारवाई?
3 कल्याण-डोंबिवली पालिकेतून वगळलेल्या २७ गावांच्या विकास आराखडय़ास मान्यता
Just Now!
X