सेव्हन हिल्समध्ये लसीकरण केंद्र सुरू

मुंबई : मुंबईला राज्याकडून कोव्हिशिल्ड लशींच्या एक लाख २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असून सेव्हन हिल्स रुग्णालयातील लसीकरण कें द्र बुधवारी सुरू झाले आहे.

राज्याकडून मुंबईला पहिल्या टप्प्यात कोव्हिशिल्ड लशीच्या एक लाख ३९ हजार मात्रा मिळालेल्या होत्या. तर लसीकरणासाठी सुमारे दीड लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी के ली होती. त्यामुळे उपलब्ध लशींच्या साठ्यांमधून पालिके ने ६० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन के ले होते. लशीचा पुढचा साठा कें द्राकडून आला असून यात एक लाख २५ हजार मात्रा मुंबईला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजनही सुरू के ल्याची माहिती पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत सध्या १० लसीकरण कें द्र आहेत. या कें द्रांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने मरोळ येथील सेव्हन हिल्स या करोना रुग्णालयातही लसीकरण कें द्र सुरू के ले आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी स्वत: लस घेऊन या कें द्राचे बुधवारी उद्घाटन केले.

या कें द्रामध्ये १५ कक्ष उभारले आहेत. प्रत्येक कक्षात १०० याप्रमाणे दीड हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची क्षमता या कें द्राची आहे. सध्या रुग्णालयाला चार हजार लशींच्या मात्रा दिल्या असून यांची साठवणूक करण्यासाठी शीतगृह (आयएलआर) दिलेले आहे. या शीतगृहामध्ये सहा हजारांहून अधिक मात्रा साठविणे शक्य आहे. पहिल्या दिवशी ९०० लाभार्थ्यांची यादी दिलेली होती. या कें द्रात बुधवारी ३७६ जणांनी लस घेतली,’ असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.

३० लसीकरण केंद्रे कार्यरत होणार

लसीकरण प्रक्रि या वेगाने करण्यासाठी पुढील काही दिवसांत शहरात आणखी तीस लसीकरण कें द्रे कार्यरत करण्यात येणार आहेत. सध्या के ईएम, लो. टिळक, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह भाभा रुग्णालय (वांद्रे), शताब्दी रुग्णालय (कांदिवली) आणि व्ही. एन. देसाई (सांताक्रूझ) या तीन उपनगरीय रुग्णालयांचा समावेश आहे. आता आणखी नऊ उपनगरीय रुग्णालयांमध्ये लसीकरण कें द्र उभारण्यात येणार आहे. तसेच वांद्रे-कु र्ला संकु लातील करोना आरोग्य कें द्रानंतर आणखी चार मोठ्या करोना आरोग्य कें द्रातही लसीकरण कें द्र सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त १४ प्रसूतिगृह आणि दवाखान्यांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू होतील. सध्या लसीकरणासाठी ४० कक्ष कार्यरत असून यांची संख्या ७२ होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.