News Flash

दिव्यात डॉ.आंबेडकरांचे बॅनर उतरवल्याने रेल रोको

दिवा रेल्वे स्थानकालगत असलेल्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतापलेल्या त्यांच्या अनुयायांनी या मार्गावरील धीमी वाहतूक तब्बल

| December 6, 2013 08:08 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर काढल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दिवा स्थानकात लोकांनी काही काळ रेल रोको केला. (छायाः लोकसत्ता)

दिवा रेल्वे स्थानकालगत असलेल्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतापलेल्या त्यांच्या अनुयायांनी या मार्गावरील धीमी वाहतूक तब्बल दीड तास रोखून धरली. दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या दिव्यातील अनुयायांनी हे बॅनर उतरविणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत वाद घातला. त्यामुळे दिवा स्थानकात तणाव निर्माण झाला होता.  या आंदोलनामुळे सकाळच्या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते दिवा दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने या मार्गावरील दहा लोकल रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने जमावा विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी रात्री उशीरापर्यत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2013 8:08 am

Web Title: cr trains affected due to rail roko
Next Stories
1 विजेवर संकट!
2 क्लस्टर डेव्हलपमेंट धोरण ठरविताना अनधिकृत इमारतींबाबत मतभेद
3 न्यायालयाचा निर्णय सलमानला फलदायी?
Just Now!
X