05 March 2021

News Flash

रेल्वे रुळांवर पेटता सिलिंडर

पेटता सिलिंडर घेऊन कामगारांनीही धोका पत्करत पश्चिम दिशेलाच रुळांपासून थोडे दूर एका झाडीत सिलिंडर फेकून दिला .

(संग्रहित छायाचित्र)

मोटरमनच्या प्रसंगवधानामुळे अपघात टळला; माटुंगा ते शीव स्थानकादरम्यानची घटना

माटुंगा-कुर्ला मार्गादरम्यान माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सोमवारी दुपारच्या सुमारास पेटता सिलिंडर आढळून आल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर या मार्गावर सुसाट निघालेली लोकल रेल्वे कामगारांनी हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सावध केल्याने लोकलच्या मोटरमनने आपत्कालिन ब्रेक दाबून लोकल थांबवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. सुरक्षेचे नियम न पाळता रेल्वे रुळांलगत सुरू असलेल्या या कामांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सीएसएमटीतून सोमवारी दुपारी १२.३६ च्या सुमारास अंबरनाथसाठी धीमी लोकल सुटली. या लोकलवर मोटरमन महेश परमार कार्यरत होते. लोकलने दुपारी १२.५७ वाजता माटुंगा स्थानक सोडले. त्यावेळी लोकलने चांगलाच वेग पकडला होता. मात्र अप जलद व डाऊन जलद मार्गिकेच्या मधल्या भागांत काही काम सुरू होते. यासाठी गॅस सिलिंडरचाही वापर केला जात होता. त्याचे वळी सिलिंडरने पेट घेतल्याचे मोटरमन परमार यांना दिसले. त्याच वेळी जवळपास असलेले कामगारही लोकल थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. सिलिंडर पेटत असल्याने त्याचा मोठा स्फोट होऊन जवळूनच जाणाऱ्या लोकल गाडीलाही त्याचा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्याने खबरदारी म्हणून परमार यांनी आपत्कालीन ब्रेक दाबून लोकल थांबवली. त्यामुळे लोकल घटनास्थळापासून आधी थांबली. तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणखी एका लोकल गाडय़ा सायन स्थानकाजवळ थांबवण्यातही कामगारांना यश आले. पेटता सिलिंडर घेऊन कामगारांनीही धोका पत्करत पश्चिम दिशेलाच रुळांपासून थोडे दूर एका झाडीत सिलिंडर फेकून दिला आणि काही वेळात सिलिंडरला लागलेली आग विझली. त्यामुळे मोठा अनर्थही टळला. परंतु सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठय़ा अपघाताला तोंड द्यावे लागले असते.

कामगारांनी सावध केल्याने लोकलमधील आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवली. आग विझवण्यासाठी माझ्याजवळील अग्निरोधक यंत्रणाही कामगारांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांनी पेटता सिलिंडर घेऊन पश्चिम दिशेला एका झुडपात टाकून दिला.

– महेश परमार, मोटरमन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 12:18 am

Web Title: cylinders lit on railway tracks akp 94
Next Stories
1 ‘मेट्रो-३’च्या कामांमुळे इमारतीला तडे
2 जे.जे. रुग्णालयात ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा
3 ”काँग्रेसशी चर्चा करून राष्ट्रवादीचा उद्या अंतिम निर्णय”
Just Now!
X