मालाड परिसरामध्ये रविवारी एका बंद कारमध्ये निसार अहमद जानी (४० वर्षे) नामक व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. विशेष म्हणजे या कारचा एसी चालू होता आणि गाडीचे चारही दरवाजे बंद होते. रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातील आजूबाजूच्या लोकांनी इंडिका कारमध्ये निसारचा मृतदेह पाहिला आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांनी कारचे दरवाजे तोडून कारचा एसी बंद केला. चालकाच्या सीटवर बसलेला निसारचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
दरम्यान, बंद कारमधील एसीमुळे निसारचा मृत्यू झाला आहे कि, त्यामागे आणखी काही कारण आहे, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.