25 November 2020

News Flash

धक्कादायक! माहिम समुद्रकिनाऱ्यावर सूटकेसमध्ये सापडले मानवी शरीराचे तुकडे

संध्याकाळच्या सुमारास समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या नागरीकांचे लक्ष किनाऱ्यावर पडलेल्या या सूटकेसवर गेले.

मुंबईत माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या एका सूटकेसमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संध्याकाळच्या सुमारास समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या नागरीकांचे लक्ष किनाऱ्यावर पडलेल्या या सूटकेसवर गेले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

माहिममधील प्रसिद्ध मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागच्या बाजूस ही सूटकेस सापडली. सूटकेसमध्ये काळया रंगाची एका प्लास्टिकची पिशवी होती. त्यामध्ये मानवी शरीराचे हे तुकडे होते. हात आणि पाय कापून सूटकेसमध्ये भरलेले होते. अमेरिकन टुरिस्टर कंपनीची ही सूटकेस असल्याची माहिती आहे.

सूटकेसमधील अवयव एकाच व्यक्तीचे नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हात महिलेचा तर पाय पुरुषाचा असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवले आहेत. मृतदेहाचे अन्य तुकडे आसपास सापडण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. प्रक्रियेनुसार माहिम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:15 pm

Web Title: dead body parts found in suitcase at mahim beach dmp 82
Next Stories
1 मुंबईत महिन्याभरात ‘इथे’ उभा राहणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा?
2 बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन मनसेच्या एकमेव आमदाराचा उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले…
3 पालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना मंजुरीचे वेध
Just Now!
X