News Flash

कर्जबाजारी युवकाची अंधेरीत आत्महत्या

घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने मानसिक तणाव आलेल्या दिनेश झापडिया (२५) या तरुणाने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

| December 3, 2013 12:50 pm

घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने मानसिक तणाव आलेल्या दिनेश झापडिया (२५) या तरुणाने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्ली येथे तो राहत होता. कर्जफेडीसाठी वारंवार तगादा लावणारे लोक घरी येत असल्याचे पाहून या मुलाच्या वडिलांनी त्याला दटावले होते. त्यानंतर या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले.
बीएमसी चाळीत राहणाऱ्या दिनेशने विविध लोकांकडून कर्ज घेतले होते. मात्र ते वेळेवर फेडणे त्याला शक्य होत नव्हते. परिणामी कर्जदार रोज त्याच्या घरी येऊन परतफेड करण्याचा धोशा लावत होते. रोजच्या या प्रकारामुळे दिनेशचे वडिलांनी वैतागून त्याला शनिवारी मारहाण केली होती. त्यामुळे व्यथित झालेल्या दिनेशने रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:50 pm

Web Title: defaulter youth commit suicide in andheri
Next Stories
1 स्टेट बँक अधिकाऱ्याच्या घरावर छापे
2 ‘लकी कंपाऊंड’ प्रकरणातील आरोपी रुग्णालयात
3 बनावट प्रवासी एजंटला अटक
Just Now!
X