News Flash

JNU Violence : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भाजपा कार्यालयासमोर निदर्शने

'जेएनयू' विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा नोंदवला निषेध

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) मध्ये विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईतील भाजपाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

शनिवारी रात्री जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत.हा हल्ला पुर्वनियोजित होता हे लक्षात येत असून त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या युवकांनी जोरदार घोषणाबाजी केलीच शिवाय फलक दाखवत निषेध व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 3:54 pm

Web Title: demonstrations of ncp youth congress before bjp office msr 87
Next Stories
1 सर्व मंत्र्यांचे समाधान करताना काँग्रेसची तारेवरची कसरत
2 महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच
3 ‘जितके अत्याचार, लढा तितकाच प्रखर’
Just Now!
X