News Flash

चित्रपट संकलक तरुणीची प्रेमभंगाच्या नैराश्यातून आत्महत्या

चित्रपटसृष्टीत संकलक म्हणून काम करणाऱ्या पल्लवी झा या २२ वर्षांच्या तरुणीने ओशिवरा येथील भाडय़ाच्या घरात रविवारी रात्री छताला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. प्रेमभंगातूनच तिने

| July 2, 2013 03:14 am

चित्रपटसृष्टीत संकलक म्हणून काम करणाऱ्या पल्लवी झा या २२ वर्षांच्या तरुणीने ओशिवरा येथील भाडय़ाच्या घरात रविवारी रात्री छताला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. प्रेमभंगातूनच तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मूळची दिल्लीची असलेली पल्लवी ओशिवरा येथील आदर्श नगरमधील ४७१ क्रमांकाच्या चाळीत पहिल्या मजल्यावर मैत्रिणीसह भाडय़ाने राहत होती. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ कुठलीही चिठ्ठी सापडली नाही. मैत्रिणीकडे चौकशी केली असता तिच्या फसलेल्या लग्नाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर शैलेंद्र शर्मा याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या हेतूने दोन वर्षांपूर्वी पल्लवी मुंबईत आली होती. ती संकलक म्हणून कामही करीत होती. दिल्लीत राहणाऱ्या शैलेन्द्र शर्मा या  तरूणाशी तिचा प्रेमविवाहही ठरला होता. परंतु शर्मा कुटुंबीयांकडून ३५ लाख रुपये हुंडा मागण्यात आला. तो न दिल्यामुळे त्यांचे लग्न मोडले होते. तेव्हापासून ती खूप अस्वस्थ होती.
त्यानंतर तिने शर्माविरुद्ध दिल्लीत बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप तिने तक्रारीत केला होता. त्यानंतर ही तक्रार मागे घ्यावी म्हणून शर्मा तिचा सतत मानसिक छळ करीत होता, असे वरिष्ठ निरीक्षक नासीर पठाण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 3:14 am

Web Title: depressed girl commit suicide after painful breakup
Next Stories
1 धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा
2 वर्षभरानंतर खुनाचे रहस्य उलगडण्यात यश
3 प्रवाशांना लुबाडणाऱ्या नकली तिकीट तपासनीसाला अटक
Just Now!
X