|| शैलजा तिवले

केईएमच्या घटनेनंतर पालिकेच्या सूचना

मुंबई :  साथरोग नियंत्रणाची साथ तिसऱ्या टप्प्यात आली असूनही मान्य न करण्याच्या सरकारच्या भूमिकेचा फटका के ईएम रुग्णालयाला बसला आहे. परदेश प्रवास किं वा बाधित व्यक्तींशी संपर्क न आलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर जाग्या झालेल्या पालिके ने आता संशयास्पद लक्षणे असलेला रुग्ण आढळल्यास करोनाचा संशयित रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात किंवा वेगळ्या खोलीत नेऊन उपचार करा, अशा सूचना रुग्णालयांना दिलेल्या आहेत.

 

केईएम रुग्णालयात ४० वर्षांची महिला शनिवारी रुग्णालयात आली, तेव्हा आपात्कालीन विभागात तपासणी केली. त्यानंतर तिला विलगीकरण कक्षात नेऊन उपचार सुरू केले. दरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या चाचणीमध्ये तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु हे लक्षात येईपर्यंत रुग्णालयातील मेडिसिन (औषधशास्त्र) विभागातील ११ डॉक्टर आणि पाच परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी तिच्या थेट संपर्कात आले होते. या १६ जणांनाही अलग राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच तिचा मृतदेहही रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. संशयास्पद मृत्यू असूनही त्यावेळी तातडीने तिच्या निकटवर्तीयांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्याऐवजी त्यांनाच कस्तुरबामधून अहवाल आणण्यासाठी पाठविले होते.

कांदिवली येथे राहणाऱ्या या महिलेला कोणताही परदेश प्रवास किं वा बाधित व्यक्तीचा संपर्क असल्याचा इतिहास नाही. त्यामुळे पालिकेने दिलेल्या नियमावलीमध्ये ती बसत नसल्याने तिच्यावर सर्वसामान्य रुग्णांप्रमाणेच रुग्णालयात उपचार के ले गेले. परंतु ही चूक लक्षात आल्यावर पालिके ने नियमावलीमध्ये बदल के ले आहेत.

रुग्ण दाखल झाल्यानंतर दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी काही लक्षणे दिसत असल्यास आपत्कालीन विभागात उपचार न करता करोनाचा संशयित रुग्ण म्हणून त्याला तातडीने विलगीकरण कक्षात किंवा वेगळ्या खोलीत दाखल करून उपचार करावेत. मग त्याची चाचणी करावी. अहवाल येईपर्यंत त्याला संशयित रुग्ण समजूनच सुरक्षित साधनांचा वापर सेवा देताना करावा, अशा सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.