News Flash

दिग्दर्शकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

लघुपट आणि मालिका यांचे दिग्दर्शन करणाऱ्या अमित त्रिवेदी यांचा मृतदेह ओशिवरा येथील त्यांच्या राहत्या घरी सापडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

| July 30, 2015 12:01 pm

लघुपट आणि मालिका यांचे दिग्दर्शन करणाऱ्या अमित त्रिवेदी यांचा मृतदेह ओशिवरा येथील त्यांच्या राहत्या घरी सापडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र या मृत्यूमागे कोणतेही संशयास्पद कारण नसून हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचा संशय ओशिवरा पोलिसांनी व्यक्त केला. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत ठोस माहिती मिळू शकणार आहे.
ओशिवरा भागातील स्नेहा अपार्टमेण्टमधील दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत अमित त्रिवेदी हे भाडय़ाने राहत होते.  अमित यांच्याशी गेल्या दोन दिवसांपासून कोणाचाही संपर्क होऊ शकत नव्हता.  त्यांचा एक मित्र बुधवारी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आला असता कोणीच दरवाजा उघडत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचबरोबर घरातून प्रचंड दरुगधी येत असल्याचेही त्याला जाणवले.या मित्राने तातडीने ओशिवरा पोलिसांत धाव घेत ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी  तपास केला असता त्रिवेदी  मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास खानविलकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:01 pm

Web Title: director bodies found
Next Stories
1 गुगलच्या होमपेजवर अब्दुल कलामांना श्रद्धांजली
2 कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत याकुब मेमनचा मुंबईत दफनविधी
3 प्रत्येक विभागात १० कामे करण्याचे बंधन
Just Now!
X