दुष्काळ, गारपीट आणि आता अवकाळी पावसामुळे बळी राजा हवालदिल झाला आहे तर, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची, यामुळे सरकारही पेचात सापडले आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानीचे पंचनाने करुन तातडीने अवहाल देण्याचे सर्व विभागीय आयुत्कांना त्यांनी आदेश दिले आहेत.
अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळे  गहू, हारभरा, सोयाबीन, आंबा, काजू, द्राक्षे, बेदाणे अशा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकटय़ा यवतमाळ जिल्ह्यातच १५ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यावरुन राज्यातील एकूण नुकसानीचा आकडा मोठा असणार आहे.