कांदिवली येथील रघुलीला मॉलमधील दुकानदार आणि मॉलचे व्यवस्थापन मंडळ यांच्यात देखभाल खर्चावरून वाद निर्माण झाला आहे. व्यवस्थापन मंडळाच्या विरोधात  २०० दुकानदार/व्यावसायिक सोमवारी संपावर गेले होते.
विद्युत देयक भरले नसल्यामुळे मॉलमधील दुकानाबाहेरील जागेतील दिवे, मॉलमधील मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, सरकते जिने, सुरक्षा कॅमेऱ्यांची यंत्रणा गेल्या २० ते २५ दिवसांपासून बंद आहेत. थकीत वीज देयकाची रक्कम एक कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. मॉलमधील या गैरसोयींच्या निषेधार्थ तेथील दुकानदार संघटित झाले असून यातून त्यांनी सोमवारी बंद पुकारला.