डॉक्टरांनी लिहिलेली औषधांची नावे केवळ औषधविक्रेतेच वाचू शकतात, हा आतापर्यंतचा अनुभव इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. औषधांची नावे इंग्रजी कॅपिटल अक्षरात व जेनेरिकमध्ये लिहिली जावीत, अशी अधिसूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. याबाबत १७ ऑगस्टपर्यंत जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून, त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
रुग्णांना औषधे लिहून देताना चुकीच्या शब्दरचनेमुळे किंवा अक्षर वाचता न आल्याने अनेकदा चुकीचे औषध रुग्णाला मिळण्याची शक्यता असते. याबाबत अनेकदा विविध स्तरांवरून मतप्रदर्शन व सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय वैद्यक परिषदेच्या २००२च्या नियमांनुसारही जेनेरिक औषधांची नावे लिहून देण्याची सूचना डॉक्टरांना करण्यात आली आहे. औषधांच्या कंपनीचे नाव लिहून देण्याऐवजी फक्त मूळ औषधाचे (जेनेरिक) नाव लिहून दिल्यास विशिष्ट कंपन्यांना आर्थिक फायदा होण्याऐवजी रुग्णांना औषधांचे पर्याय उपलब्ध होतील. या दुहेरी हेतूने डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधांची सुवाच्च कॅपिटल अक्षरात तसेच जेनेरिकमध्ये नावे लिहावीत हा मुद्दा गेली काही वर्षे चर्चेत होता. जेनेरिक नावाने औषधे लिहिण्यात रुग्णांचे हित आहे. मात्र, भारतीय बाजारपेठांमधील जेनेरिक औषधांची उपलब्धता, दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असून केवळ नफ्याचे प्रमाण पाहून विशिष्ट कंपनीची औषधे केमिस्टकडून दिली जाण्याची शक्यता आहे.  १७ ऑगस्टपर्यंत या सूचनेवरील हरकती, सूचना ali.rizvi@nic.in वर पाठवायच्या आहेत. सूचनांबाबत सुनावणी घेऊन त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

आजही आपल्या समाजात पुरेसे औषधभान नाही. त्यामुळे हे धोके टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत अन्यथा या निर्णयाचा उलटा परिणाम होण्याचा धोका आहे.
– डॉ. सुहास पिंगळे,
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सचिव)

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी