21 September 2020

News Flash

सेवाव्रतींना अर्थबळ

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचकोंनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत या संस्थांना मोठे आर्थिक  पाठबळ दिले

डॉ. राणी बंग

डॉ. राणी बंग यांच्या हस्ते आज धनादेश वितरण

मुंबई : उपेक्षितांच्या उत्कर्षांसाठी कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या आठव्या ‘दानयज्ञा’स दानशूरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा या उपक्रमात दानवीरांनी सुमारे सव्वादोन कोटींचे दान दिले. या निधीचे धनादेश मंगळवारी सांगता सोहळ्यात प्रसिद्ध समाजसेविका डॉ. राणी बंग यांच्या हस्ते १० संस्थांकडे सुपूर्द क रण्यात येतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचकोंनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत या संस्थांना मोठे आर्थिक  पाठबळ दिले. सुमारे सव्वादोन क ोटींचे अर्थबळ उभे करून वाचकांनी या संस्थांच्या कामाला दाद दिली आहे.

* प्रमुख उपस्थिती : प्रसिद्ध समाजसेविका डॉ. राणी बंग

* कुठे? दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाटय़गृहाशेजारी, माटुंगा, वेळ- सायंकाळी ५ वाजता.

* कोर्यक्र म सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.

यंदाच्या संस्था

’ विशेष मुलांच्या प्रगतीसाठी कार्यरत ‘सोबती पालक संघटना’

’ काश्मिरातील दहशतवादाने अनाथ झालेल्या चिमुकल्यांसाठी काम करणारे ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’

’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी भिडणारे यवतमाळचे ‘दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ’

’ वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे बार्शीचे ‘स्नेहग्राम’

’ भारतीय संगीताचा स्वरवारसा जपणारे सोलापूरचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’

’ नवीन पिढीवर विज्ञान संस्कार घडवणारे कुडाळचे ‘वसुंधरा विज्ञान केंद्र’

’ जखमी प्राण्यांसाठी झटणाऱ्या सिद्धार्थ व सृष्टी सोनवणेंचा ‘सर्पराज्ञी प्रकल्प’

’ अपंगांच्या पुनर्वसनाचे काम करणारी कोल्हापूरची ‘हेल्पर्स ऑफ हॅण्डिकॅप्ड’

’ गतिमंद मुलांचे शिक्षण, त्यांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची फळी उभारणारी वाईची ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’

’ महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक घडणीत मोठे योगदान दिलेली पुण्याची ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:01 am

Web Title: dr rani bang loksatta sarva karyeshu sarvada event
Next Stories
1 सरकत्या जिन्यांना विनाकारण ‘ब्रेक’
2 क्लीनअप मार्शलविरोधात खंडणीचा गुन्हा
3 मुंबई-गोवा क्रूझ व्हाया रत्नागिरी
Just Now!
X