मुंबई : मुंबई महापालिके चा अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी दरवर्षी प्रमाणे यंदाही त्यात बदल करून राजकीय पक्षांसाठी वाढीव निधी मिळवण्याचा प्रयत्न स्थायी समितीतर्फे  केला जाणार आहे.   निवडणुकीला एक वर्ष उरल्यामुळे प्रभागात विविध आकर्षक विकासकामे नगरसेवकांकडून सुचवली जाणार आहेत. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर वाढीव निधीची तरतूद के ली जाण्याची शक्यता आहे. यावर्षी राजकीय पक्षांसाठी ६०० कोटींचा निधी देण्यात आला होता. यंदा मात्र एका बाजूला पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना बदल करून किती निधी पक्षांना मिळणार याबाबत उत्सुकता  आहे.

मुंबई महापालिकेचा  अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी नुकताच मांडला. हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला असून गेल्या आठवड्यापासून स्थायी समितीच्या विशेष सभांमध्ये त्यावर चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करताना दरवर्षी त्यात बदल करून शेकडो कोटी रुपयांचा निधी नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी वापरला जातो. चालू आर्थिक वर्षात अशा प्रकारची ६०० कोटी रुपयांचे बदल करण्यात आले आहेत. पक्षीय संख्याबलानुसार त्याचे वाटप के ले जाते.   नगरसेवकांना दरवर्षी एक कोटींचा विकास निधी समान मिळतो. मात्र हा निधी ठरावीक कामांसाठी वापरता येतो. याशिवाय काही वेगळी कल्पक विकास कामे करायची असल्यास त्याकरिता स्थायी समितीकडून काही लाख किवा कोटींचा निधी नगरसेवकांना मिळवता येतो. त्याकरिता स्थायी समितीकडे तशा सूचना कराव्या लागतात. पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात पालिके च्या निवडणुका असल्यामुळे नगरसेवक आपापल्या विभागातील लोकांची मते मिळवण्यासाठी जास्तीत जास्त विकासकामे करून घेण्याचा सपाटा लावणार यात शंका नाही. त्यामुळे यंदा स्थायी समितीकडे जादा निधीची मागणी नगरसेवकांकडून के ली जात आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात किमान ८०० कोटी रुपयांची कामे  नगरसेवक आणि गटनेत्यांकडून प्रस्तावित केली जाण्याची शक्यता आहे.