16 January 2019

News Flash

मस्जिद बंदर स्थानकात रेल्वेच्या टपावर चढलेल्या तरुणाला शॉक

तरूणाचे नाव काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही त्याला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे.

मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात एक तरूण लोकल ट्रेनच्या टपावर चढला. या तरुणाला वीजेचा जबरदस्त धक्का बसला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे नाव काय आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला आहे. अनेकदा गर्दी टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासी टपावर चढून प्रवास करतात. त्यातून  त्यांचे मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रवासी हट्टीपणे टपावर चढण्याचा आततायी निर्णय घेतातच. अशात हा तरूण नेमका लोकलच्या टपावर का चढला होता हे समजू शकलेले नाही. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

First Published on June 14, 2018 1:25 pm

Web Title: electric shock to youth who climbed on local train in masjid bandar station