‘हॅकेथॉन’मध्ये १५० प्रकल्प नमुन्यातील उत्कृष्ट प्रकल्पांचे सादरीकरण
पाणी, ऊर्जा आणि वाहतूक या शहरांच्या महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी देशातील विविध आयआयटी आणि नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण असे १५० प्रकल्प नमुने तयार केले आहेत. त्यामधील उत्कृष्ट नमुन्यांची निवड करून त्याचे सादरीकरण ‘मेक इन इंडिया’त ‘हॅकेथॉन २०१६’ मध्ये करण्यात आले. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि बुद्धिमत्ता यामध्ये अजोड असलेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना सर्वानीच दाद दिली. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट्सअप’च्या माध्यमातून कायापालट घडवीत असताना देशभरातील आयआयटीसह नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तंत्रज्ञांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल, असे केंद्रीय औद्योगिक विकास आणि प्रोत्साहन खात्याचे सचिव अमिताभ कांत यांनी या वेळी बोलताना सांगितले.
मेक इन इंडियामध्ये मंगळवारी ‘हॅकेथॉन’चे वेगळे महत्त्व होते. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि बुद्धिमत्तेसाठी ओळख असलेल्या देशातील आयआयटी आणि नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी शहरांच्या मुख्य समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार केले आहेत. नवीन संकल्पनांच्या आधारे आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरतील, असे प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारच्या माध्यमातून राबविले गेल्यास त्यातून हे प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. भारतात निर्मिती उद्योगांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ करायची असेल, तर संशोधन व नवीन संकल्पनांचा आधार असलाच पाहिजे. त्यासाठी शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यात समन्वय व सहकार्य निर्माण करावे लागेल.
त्याकडे याआधी फारसे लक्ष दिले गेले नाही, असे कांत यांनी या वेळी बोलताना सांगितले.

मुंबईच्या विवेकानंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची बाजी
पाण्यासाठीच्या प्रकल्पामध्ये मुंबईतील विवेकानंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. तर आसामच्या जोधपूर अभियांत्रिकी महाविद्यालयास द्वितीय क्रमांक मिळाला. ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पासाठी आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला. तर कोइम्बतूरच्या चेन्नई आणि कर्पगम अभियांत्रिकी महाविद्यालयास दुसरा क्रमांक मिळाला. परिवहन क्षेत्रामध्ये गाझियाबादच्या कृष्णा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आघाडी घेऊन पहिला क्रमांक मिळविला. तर दुसरा क्रमांक अहमदाबादच्या सेंटर फॉर एन्व्हायरन्मेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी संस्थेला मिळाला.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव