News Flash

अखेर ‘तो’ मृतदेह सापडला

हत्या झालेली व्यक्ती मारेकऱ्याच्या स्वप्नात येऊन छळत असल्याने नुकतीच एका हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली होती.

| December 4, 2014 02:58 am

हत्या झालेली व्यक्ती मारेकऱ्याच्या स्वप्नात येऊन छळत असल्याने नुकतीच एका हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली होती. या आरोपीने पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केले होते, पण हत्या करून फेकलेला मृतदेह सापडत नव्हता. अखेर बुधवारी कुरार पोलिसांनी हा मृतदेह नाल्यातून शोधून काढला आहे. मकबूल हसन सरदार अली याच्या मेव्हणीशी सादिक अली चारमिया याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे मकबूलने त्याची हत्या केली. मात्र या हत्येनंतर घाबरलेल्या मकबूलच्या स्वप्नात येऊन सादिक त्याला छळत होता. तू माझी हत्या केली, मी तुला सोडणार नाही, अशा प्रकारची स्वप्ने त्याला पडत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2014 2:58 am

Web Title: eventually that dead body found
टॅग : Dead Body
Next Stories
1 दोन विद्यार्थ्यांच्या सचोटीमुळे ८० हजार परत मिळाले!
2 महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ विशेष सेवा
3 ठाण्यात पोलिसांनी बालविवाह रोखला
Just Now!
X