News Flash

वडाळा शाळेतील गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

वडय़ाळ्यातील जे. के. नॉलेज ट्रस्टच्या मुंबई विद्यालयात गेल्या वर्षभरापासून गैरप्रकार सुरू असून विद्यार्थिनींनी शिक्षक तसेच व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात होता ही गंभीर

| January 11, 2013 04:54 am

आरोपी शिक्षकांची जामिनावर सुटका
वडय़ाळ्यातील जे. के. नॉलेज ट्रस्टच्या मुंबई विद्यालयात गेल्या वर्षभरापासून गैरप्रकार सुरू असून विद्यार्थिनींनी शिक्षक तसेच व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात होता ही गंभीर बाब आहे. कोणीही दखल घेत नव्हते. तसेच पोलिसांकडे तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत होते. परंतु, मनसेच्या पुढाकाराने याबाबत कारवाई करण्यात आल्याचा दावा मनसे महिला उपाध्यक्ष रिटा गुप्ता यांनी केला आहे. शाळेतील या सर्व गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणीही गुप्ता यांनी केली आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विनयभंग झालेल्या ११ पीडित विद्यार्थिनींनी तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर मदन कोळकर, दीपक आवारे, किशोर बरगडे या तीन शिक्षकांना अटक करण्यात आली होती. याबाबत बोलताना वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग इंदूलकर म्हणाले की, तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका झाली. आणखी विद्यार्थिनी तक्रारीसाठी पुढे आलेल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 4:54 am

Web Title: expectation for vadala school ford case
टॅग : Frod
Next Stories
1 गुलशन कुमार हत्याप्रकरण
2 विद्यार्थिनीचा अश्लील एमएमएस बनवणाऱ्या मदरशाच्या ७० वर्षीय विश्वस्तास अटक
3 ‘मनवासे’ची सर्व पदे बरखास्त
Just Now!
X