News Flash

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार

अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य 'अँटिलिया' इमारत आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत.

कारमधून जिलेटीन सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्याचे गृहराज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी सांगितले. अँटिलियाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले.

गाडीची नंबर प्लेट बनावट होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.वाहतूक पोलिसांनी ही स्कॉर्पियो ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे.

अंबानी यांच्या सुरक्षा रक्षकांना ही कार आढळली. त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गामदेवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व स्कॉर्पिओची तपासणी सुरु केली. गाडीत जिलेटीनच्या २० कांडया सापडल्या. श्वान पथकालाही तपासासाठी तिथे आणले होते. फक्त जिलेटीन कांडया सापडल्या असे मुंबई पोलिसांच्या पीआरओने सांगितले.

स्फोटक साहित्य सापडल्यानंतर कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसच्या एटीएसचे पथकही तिथे येऊन गेले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 8:15 pm

Web Title: explosive material was found in car outside antillia its mukesh ambani home dmp 82
Next Stories
1 सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत १ हजारापेक्षा जास्त करोना रुग्णवाढ
2 मुंबईत करोनाची लक्षणे नसलेले ८५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण
3 करोना रुग्ण वाढत असल्याने मुंबई पालिकेचा मोठा निर्णय; ‘हे’ प्रसिद्ध मैदान केलं बंद
Just Now!
X