मुंबई: करोना साथीच्या दुसऱ्या लाटेआधी लोकल रेल्वेचा पास काढलेल्या सामान्य नागरिकांच्या त्या पासला आता उर्वरित दिवसांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.  पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या  जुन्या पासला उर्वरित दिवसांसाठी मुदतवाढ न दिल्याने नाइलाजाने नवा पास काढावा लागत होता. एकीकडे मध्य रेल्वेने मुदतवाढीची अंमलबजावणी सुरू के ली असतानाच पश्चिम रेल्वेला मात्र त्याचा विसर पडला होता. परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेवरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

करोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल प्रवासावर एप्रिल २०२१ पासून निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर १५ ऑगस्टपासून प्रवासमुभा दिली होती. परंतु पासला मुदतवाढ दिली नव्हती.