07 August 2020

News Flash

पालघर फेसबुक प्रकरणाची ‘फाइल बंद’!

माहिती तंत्रज्ञान कायद्यातील त्रुटींवरच बोट ठेवणाऱ्या आणि राज्यात खळबळ माजविणाऱ्या फेसबुक प्रकरणी पालघर येथील दोन्ही तरुणींवरील गुन्हे मागे घेऊन हे प्रकरण निकालात काढण्यात येणार

| November 30, 2012 03:25 am

माहिती तंत्रज्ञान कायद्यातील त्रुटींवरच बोट ठेवणाऱ्या आणि राज्यात खळबळ माजविणाऱ्या फेसबुक प्रकरणी पालघर येथील दोन्ही तरुणींवरील  गुन्हे मागे घेऊन हे प्रकरण निकालात काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघरच्या शाहिन धीडा या तरुणीने फेसबुकवरील प्रतिक्रियेत मुंबई बंद विरोधात मतप्रदर्शन केले होते. याला तिची मैत्रिण रेणू हिने पाठिंबा दिल्याने शिवसेनेत संताप पसरला होता. शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर पालघर पोलिसांनी या दोघींच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली होती. या मुलींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणार नसल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी सांगितले. मुंबईत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या दोन्ही तरुणींच्या अटकेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते. गृहखात्याने कोकण विभागीय परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुखबिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. त्याच्या अहवालानुसार ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक रवींद्र सेनगावकर आणि पालघरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आले होते.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2012 3:25 am

Web Title: facebook matter closed
टॅग Facebook
Next Stories
1 ६३ हजार पोलिसांची भरती
2 साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक अवैध ठरण्याच्या शक्यतेने खळबळ
3 कराड आणि सांगली संमेलनांनाही वादाची झालर होतीच..
Just Now!
X