News Flash

बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन गंडवणारी टोळी अटकेत

बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या एका टोळीला कुलाबा पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन मुलींचा समावेश आहे.

| January 15, 2015 03:27 am

बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या एका टोळीला कुलाबा पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन मुलींचा समावेश आहे. मुंबईतल्या पंचतारांकित ताज हॉटेलमधील एका ज्वलर्स शोरूमला त्यांनी ७ लाखांचा बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन फसवणूक केली होती. या टोळीने बनावट चलन, आधार कार्ड, रेल्वे पासेसही बनवले होते.
 अटक झालेल्यांमध्ये मिनी पांडे (२०), टिना पांडे (२१) या दोन मुलींसह सुरेंद्र पंजाबी (६०), राजेश कारानी (३७), जनक ढोलकिया (५८) आणि अशोक मेहता यांचा समावेश आहे.  पंचतारांकित आणि महागडय़ा शोरूममला ही टोळी लक्ष्य करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:27 am

Web Title: fake demand draft gang arrested
Next Stories
1 पतंगाच्या मांजाने एक जखमी
2 वृद्धांची परवड.. वृद्धाश्रमांची चैन
3 ठाण्यात डिसोजा यांचे नगरसेवकपद रद्द
Just Now!
X