News Flash

बनावट प्रवासी एजंटला अटक

बनावट पर्यटन कंपनी सुरू करून ४१७ पर्यटकांना ठकवणाऱ्या एका बनावट प्रवासी एजंटला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली.

| December 3, 2013 12:43 pm

बनावट पर्यटन कंपनी सुरू करून ४१७ पर्यटकांना ठकवणाऱ्या एका बनावट प्रवासी एजंटला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली. करण व्यास उर्फ राहुल सक्सेना (२४) असे या तरुणाचे नाव असून, त्याने १ कोटी ८६ लाख रुपयाची माया अनेक लोकांना फसवून जमा केल्याचे समोर आले आहे.
अंधेरीच्या लोखंडवाला भागातील एका मॉलमध्ये ‘मूव्ह हॉलिडेज’ या नावाने आपली पर्यटन कंपनी सुरू करणाऱ्या राहुलने गोवा, बँकॉक, केरळ, थायलंड आदी ठिकाणी सहल घेऊन जात असल्याचे भासवले. हे दुकान सुरू करताना त्याने राकेश शर्मा नावाच्या एका व्यक्तीच्या ओळखीने दुकान भाडय़ाने घेतले. अत्यंत आकर्षक पॅकेज देत त्याने अल्पावधीतच अनेक ग्राहकांना आपल्याकडे वळवले. तब्बल ४१७ पर्यटकांना आपल्या सहलीची पॅकेजेस विकली. त्यातून त्याने १ कोटी ८६ लाख १८ हजार रुपये जमवले. हे पैसे घेऊन त्याने पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पर्यटकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर विशेष पथकाची स्थापना करून त्याचा शोध घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:43 pm

Web Title: fake tourist agent arrest
टॅग : Cheat,Froud
Next Stories
1 सामूहिक विकासाची हमी! ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वर मुख्यमंत्र्यांची मोहोर
2 चित्रकला, हस्तकलेचा ‘कार्यानुभव’ का नको?
3 कृष्णेचे पाणी वळविण्यास मनाई
Just Now!
X