05 December 2020

News Flash

मुंबईच्या वेशींवर ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित

फास्टॅग ही यंत्रणा सर्व महामार्गांवर कार्यरत करणे गेल्या वर्षी बंधनकारक करण्यात आले.

 

दहिसर नाक्याला मात्र अद्याप प्रतीक्षाच

मुंबई : अखेर दहा महिन्यांनंतर मुंबईच्या वेशींवर मर्यादित स्वरूपात फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र पाच पथकर नाक्यांपैकी दहिसर नाक्यावर अद्यापही या यंत्रणेची प्रतीक्षाच आहे.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लालबहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या पाच ठिकाणी पथकर नाके आहेत. या पाचही ठिकाणी १ जानेवारी २०२० पासून फास्टॅग यंत्रणा बसविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले होते. मात्र ही यंत्रणा कार्यरत होण्यासाठी दहा महिने लागले.

‘सात दिवसांपूर्वी दहिसर वगळता सर्व नाक्यांवर ही यंत्रणा कार्यरत करण्यात आल्याचे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापैकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले. सध्या या नाक्यांवर प्रत्येकी तीन मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवसाला सुमारे दोन हजारच्या आसपास वाहने याचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

फास्टॅग ही यंत्रणा सर्व महामार्गांवर कार्यरत करणे गेल्या वर्षी बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर एमएसआरडीसीने आपणहून पुढाकार घेत मुंबईच्या वेशीवर ही यंत्रणा बसविण्याचे आदेश पथकर कंत्राटदारास दिल होते.

केवळ महामार्गांसाठी यंत्रणा नसावी

अखेरीस दिलेल्या मुदतीनंतर १० महिन्यांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली. सध्या पथकर नाक्यावर मर्यादित मार्गिकांनाच फास्टॅग असले तरी लवकरच इतर मार्गिकांवरदेखील ही यंत्रणा कार्यरत होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. फास्टॅग हे केवळ महामार्गासाठी असले तरी मुंबईतदेखील ही यंत्रणा असावी, अशी मागणी माल वाहतूकदार संघटनांनी महामंडळाकडे केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:29 am

Web Title: fastag system enabled in mumbai border akp 94
Next Stories
1 रुग्णालयांत पहिल्या ४८ तासांत ६४ टक्के मृत्यू
2 वायुगळतीचा शोध घेण्यासाठी ‘बलून’ तंत्रज्ञान
3 खाडी, समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी महापालिकेस ३० कोटींचा दंड
Just Now!
X