06 July 2020

News Flash

मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पित्यास जन्मठेप

सावत्र मुलीला विहिरीत ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला पिता भन्सनाथ ऊर्फ वसंत हरिजन याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. सईद यांनी जन्मठेपेची शिक्षा

| November 11, 2012 01:18 am

सावत्र मुलीला विहिरीत ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला पिता भन्सनाथ ऊर्फ वसंत हरिजन याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. सईद यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो भिवंडीतील लिंबुचापाडा येथील रहिवासी आहे.
भन्सनाथ याचा लता हिच्याशी पुनर्विवाह झाला होता. लताला पहिल्या पतीपासून पल्लवी ही मुलगी होती. लतापासून त्याला एक मुलगा झाला होता. हे कुटुंब एकत्र राहत होते. भन्सनाथ नेहमी लतावर चारित्र्याचा संशय घ्यायचा. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भोजनावरून लता आणि भन्सनाथ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रागामध्ये त्याने पत्नी लता आणि सावत्र मुलगी पल्लवीला घराजवळच्या विहिरीत ढकलून दिले. शेजाऱ्यांनी धावपळ केल्यानंतर लताला वाचविण्यात यश आले. पण पल्लवी बुडून मरण पावली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हेमलता देशमुख यांनी काम पाहिले.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2012 1:18 am

Web Title: father girls death reason got life imprisonment
Next Stories
1 प्राप्तिकर विभागाचे छापे
2 बोरिवलीत दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
3 बस आगारातील अपघातात बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
Just Now!
X