मालमत्तेच्या वादातून वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी संध्याकाळी धारावी येथे घडली. हत्या झालेल्या मुलाचे नाव मोहसीन अन्सारी (२४) असे आहे. धारावी पोलिसांनी त्याचे वडील जाहीद (५०) याला अटक केली आहे. जाहीद हा  धारावीतील नव्वद फूट रस्ता येथे राहत होता.त्याचा मुलगा मोहसीन शनिवारी घरात झोपलेला असताना जाहीदने त्याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केले. पोलिसांनी जाहीदला कुल्र्यात अटक केली. प्राथमिक तपासात जाहीद हा मानसिक रुग्ण असल्याचे आढळून आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.