ओला, उबर, रिक्षा, टॅक्सी चालकांसमोर संकट; खासगी बँका, वित्तसंस्थांकडून टाळेबंदीतही वाहनजप्तीची कारवाई

मुंबई : टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून उत्पन्न आटल्याने आर्थिक अडचणीत असलेले रिक्षा, टॅक्सीचालक तसेच अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवेच्या चालकांसमोर वाहनासाठी घेतलेल्या कर्जफेडीचे आव्हान उभे ठाकले आहे. या चालकांनी वाहनासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी वित्तसंस्था तसेच खासगी बँकांचा तगादा सुरू झाला आहे. काही प्रकरणांन हप्ते न फेडल्याने कर्जदाराचे वाहनही जप्त करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून रिक्षा, टॅक्सी तसेच अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवांचा व्यवसाय बुडाला आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतरही मुंबई महानगर प्रदेशात या वाहनांवरील निर्बंध कायम आहेत. प्रवासी मर्यादा, अत्यावश्यक सेवेच्या प्रवाशांनाच परवानगी आदी कारणांमुळे या सेवांच्या चालकांचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात आटले आहे. सध्या मिळणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाल्याचे अनेक चालकांचे म्हणणे आहे. त्यातच कर्जफेडीचे संकट त्यांना चिंतेत पाडत आहे. काही बँका, संस्थांनी चालकांकडे कर्जाच्या वसुलीसाठी बळजबरीही सुरू के ली आहे.

कॅ बचालक संदीप सोनावणे यांनी वाहनासाठी साडेचार लाखांचे कर्ज एका मोठय़ा खासगी अर्थसाहाय्य करणाऱ्या कं पनीकडून काढले. टाळेबंदीआधी प्रत्येक महिन्याला १५ हजार ९०० रुपये कर्जाचा हप्ता भरत होते. परंतु टाळेबंदी सुरू झाल्यानंतर उत्पन्न बुडाले आणि रोजचा खर्च भागवणेही कठीण झाल्याचे सोनावणे सांगतात. टाळेबंदी काही प्रमाणात उठवण्यात आल्यानंतर अ‍ॅपवरील कॅ बना परवानगी मिळाली. परंतु प्रवाशीच फारसे नसल्याने उत्पन्न नाही. बँकांकडून कर्ज वसुलीसाठी सतत तगादा लावला जात असल्याचे सोनावणे म्हणाले.

कळंबोलीचे अक्षय देवकर उबरच्या सेवेत आहेत. टाळेबंदीआधी महिन्याला साधारण २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळत होते. आता हजार रुपयेही कमाई होत नसल्याचे ते सांगतात. खासगी अर्थसाहाय्य संस्थेकडून काढलेल्या कर्जाचा महिन्याला १५ हजार रुपये हप्ता आहे. तो भरता न आल्याने सातत्याने संस्थेकडून तगादा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्षाचालक उदय पवार यांनीही बडय़ा खासगी अर्थसाहाय्य पुरवणाऱ्या कं पनीकडून कर्ज घेऊन रिक्षा विकत घेतली. दर महिन्याला साडेपाच हजार रुपये हप्ता भरत होते. टाळेबंदीमुळे उत्पन्नच बंद झाले. कर्ज फेडण्यासाठी दूरध्वनी येऊ लागल्याचे पवार म्हणाले. टाळेबंदीत सुरुवातीचे दोन महिने उत्पन्न नाही. जून महिन्यापासून दर दिवशी ३०० रुपयांपर्यंतच उत्पन्न मिळत असून कर्ज कसे फे डणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

खासगी बँका, संस्थांकडून चालकांकडे तगादा सुरू आहे. कर्जाचा हप्ता फे डता येत नसल्याने काहींची वाहने जप्त करण्यात आली. सध्या कर्जवसुली करू नये, अशा के ंद्र सरकारच्या सूचना असतानाही वित्तीय संस्था त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

– प्रशांत सावर्डेकर, अध्यक्ष, इंडियन फे डरेशन अ‍ॅप बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स

कर्जाच्या वसुलीसाठी चालकांना टाळेबंदीतही सातत्याने दूरध्वनी करून त्रास दिला जात आहे. चालकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी राज्य शासनाकडे के ली होती. परंतु त्याकडे दुर्लक्षच के ले.

– शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियन

कर्ज फे डता येत नसल्याने साधारण १०० पेक्षा जास्त चालकांची वाहने जप्त झाली आहेत. सध्या उत्पन्नच नसल्याने कर्जफे डीसाठी पैसा आणणार कु ठून, असा प्रश्न आहे. यासाठी शासनाकडे दाद मागितल्यानंतरही तोडगा निघालेला नाही.

– आनंद कु टे, सचिव, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ