News Flash

वरळीत नेरोलॅक पेन्टसच्या गोदामाला लागलेली आग विझवली

वरळीत श्रीराम मिल जवळच्या नेरोलॅक पेन्टसच्या गोदामाला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. नेरोलॅक ही रंगांची निर्मिती करणारी कंपनी आहे.

वरळीत श्रीराम मिल जवळच्या नेरोलॅक पेन्टसच्या गोदामाला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.  आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाडया घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या.  अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग नियंत्रणात आणली.  लेव्हल २ ची ही आग होती.

नेरोलॅक ही रंगांची निर्मिती करणारी कंपनी आहे. गोदामामध्ये रंगाचे साहित्य ठेवण्यात आले होते अशी माहिती आहे. वरळीतील श्रीराम मिलचा परिसर वर्दळीचा रस्ता आहे.

हा गजबजलेला भाग असल्याने आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. काही वेळासाठी या मार्गावर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2018 10:15 am

Web Title: fire at worli nerolac paints godown
टॅग : Fire
Next Stories
1 शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, माजी महापौर दत्ता दळवींचा फोन टॅप
2 ७० लाख रोजगार निर्माण झाले मग बेरोजगारांच्या झुंडी महाराष्ट्रावर का आदळत आहेत? – उद्धव ठाकरे
3 संस्कृतींचा सर्जनशील संवेदक
Just Now!
X