दादर मार्केटमधील कपड्याच्या एका दुकानाला आग लागल्याचं वृत्त आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अग्निशामन जवानांनी शर्थीचं प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीमध्ये सुदैवानं कोणत्याही जिवीतहानी झाली नाही. मात्र, दुकानाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

Maharashtra: Fire breaks out at a clothing shop in Dadar area of Mumbai. Six fire tenders present at the spot. More details awaited.