02 March 2021

News Flash

मुंबई : वांद्र्यातील शास्त्रीनगर परिसरात झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईच्या वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग लागण्याचे सत्र कायम

मुंबईच्या वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग लागण्याचे सत्र कायम आहे. आज पुन्हा एकदा वांद्रे पश्चिमेकडील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आग लागली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


वांद्रे पश्चिम येथील जामा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या शास्त्री नगर परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे.सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 11:02 am

Web Title: fire breaks out at a slum in bandras shastri nagar area
Next Stories
1 कॅश व्हॅनच्या सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न
2 ठाण्यातील महिलेचा न्यूझिलंडमध्ये संशयास्पद मृत्यू
3 सरकारच्या नकारघंटेमुळे काळ्या पैशाचे गूढ वाढले: शिवसेना
Just Now!
X