News Flash

तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

घटनास्थळी अग्निशमन दलाचे ७ ते ८ बंब रवाना

फोटो सौजन्य-एएनआय

नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी असलेल्या एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ‘सुधीर  शेड’ असे या कंपनीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत २ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते आहे. आग नेमकी का लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. जखमींना MGM रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर येते आहे. या जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. आगीचे मोठे लोळ आणि मोठ्या प्रमाणावर धूर या परिसरात दिसून येतो आहे. खारघर आणि वाशी या ठिकाणाहून आगीचे लोळ आणि धूर दिसून येत होते. जवळपासच्या कंपन्यांमधील कामगारांनाही सोडून देण्यात आले. आग नियंत्रणात आणण्याचे काम अद्यापही सुरू आहे.


;

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 6:10 pm

Web Title: fire breaks out in a building in turbhe midc industrial area in navi mumbai
Next Stories
1 राहुल गांधी यांच्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा !
2 ‘गुजरातचे वातावरण व चाचण्यांचा मेळ जमेना’
3 लैंगिक आजाराच्या खुणा नोंदवणारा स्मार्ट ‘निरोध’!
Just Now!
X