26 September 2020

News Flash

मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे फ्लाय ओव्हरवर तेलाच्या टँकरने घेतला पेट

ही आग का लागली त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही

मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलावर एका तेलाच्या टँकरने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी असलेल्या आरे कॉलनी फ्लाय ओव्हरवर या टँकरने अचानक पेट घेतला. यामुळे उड्डाण पुलावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येते आहे. उड्डाण पूल बंद केल्यामुळे ब्रिजच्या खाली वाहतूक कोंडी झाली होती. अंधेरीकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. आता हळू हळू ही वाहतूक पूर्वपदावर येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 2:31 pm

Web Title: fire broke out in an oil tanker on the goregaon bridge today
Next Stories
1 पश्चिम रेल्वे बदलणार लेडीज डब्यावरच्या ‘स्त्री’ची ओळख
2 मुंबईच्या गोवंडीमध्ये गोळीबाराचा थरार, दोन जखमी
3 शेतकरी कर्जमाफीसाठी पुन्हा चाचपणी
Just Now!
X